Nashik News: ग्राहकांना अखंडित, गतिमान व दर्जेदार सेवा देण्यासाठी तसेच विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी वीज देयकांची थकबाकी वसुली अत्यंत आवश्यक आहे. थकबाकीमुळे ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित केल्यानंतर परस्पर किंवा बेकायदा वीज जोडणी केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) दत्तात्रय पडळकर यांनी दिले..शुक्रवारी (ता. ९) नाशिक परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी वीज देयक थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले. ही बैठक महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे (ता. नाशिक) येथील सभागृहात पार पडली. .Illegal Tap Connection : बेकायदा नळजोडणीचे कनेक्शन घट्ट.नाशिक परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक व इतर वर्गवारीच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर वीज देयक थकबाकी प्रलंबित आहे. परिमंडळात एकूण ६ लाख ४८ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे २०८ कोटी २९ लाख रुपयांची वीज देयकांची थकबाकी आहे. त्यामुळे प्रत्येक महिनाअखेर शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. पडळकर यांनी केले. .New Electricity Connection: आता ग्रामीण भागामध्ये १५ दिवसांत नवी वीज जोडणी . ग्राहकसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आता देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आली असून, यामुळे ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्याबरोबरच वापरलेल्या विजेचे दरमहा योग्य रीडिंग घेऊन अचूक वीजबिल देण्यावर त्यांनी भर दिला. सर्व प्रकारच्या वीज जोडण्या व इतर सेवा ग्राहकांना ठराविक कालमर्यादेत व तत्काळ दिल्या गेल्या पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. .ग्राहकसेवा व थकबाकी वसुली या कामांसाठी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामाचे नियोजन करावे व दिलेल्या प्रत्येक वीज युनिटची वेळेत वसुली करावी, असे निर्देश देण्यात आले. नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंते राजेश थुल, जगदीश इंगळे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.