Nagpur News: स्मार्ट कॉटन उप प्रकल्पांतर्गत निर्धारित निकषाच्या कापूस वेचणी बॅगांचा पुरवठा न करणाऱ्या व्यावसायिकांकडून १७.५ टक्के दंड आकारला जाणार आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये साहित्याचा उशिरा पुरवठा करण्यात आल्याने संबंधित पुरवठादाराकडून सहा लाख रुपयांची वसुली करण्याचा आदेश आत्मा प्रकल्प संचालकांनी दिला आहे. .बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कापूस उपप्रकल्प राबविण्यात आला. त्याअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांना ४२ हजार कापूस वेचणी आणि २३,८०० कापूस साठवणूक बॅगांचा पुरवठा करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी केंद्रीकृत खरेदी प्रक्रिया हाती घेण्यात आली..Cotton Crop Loss: लाखेगाव येथे कपाशी पिकाला ‘आकस्मिक’ संकटाचा फटका.ही खरेदी प्रक्रिया स्मार्ट प्रकल्पाच्या आर्थिक व्यवस्थापन नियमावली आणि खरेदी विषयक मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदीनुसार पार पाडण्यात आल्याचा दावा यंत्रणांकडून होत आहे. त्याचाच आधार घेत ११ ऑक्टोबर २०२४ रोजी नाशिक येथील मे. प्रकाश ॲग्रो प्लास्ट यांना कापूस वेचणी, तर मे. माँ. भगवती बायोटेक ॲण्ड केमिकल्स वर्धा यांना कापूस साठवणूक बॅगांच्या पुरवठ्याचे आदेश देण्यात आले. त्याकरिता २५ ऑक्टोबर २०२४ रोजी करार करण्यात आला..प्रकाश ॲग्रो प्लास्टने प्रकल्पाची अंमलबजावणी होणाऱ्या सात जिल्ह्यांत साहित्याचा निर्धारित वेळेत पुरवठा केला. मात्र या साहित्याची केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्थेकडून तपासणी केली असता त्याचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले. त्यामुळे निविदेतील निकषांची पूर्तता करणाऱ्या योग्य दर्जाच्या साहित्याचा पुरवठा करावा, अशी सूचना करण्यात आली. परंतु बीड वगळता उर्वरित जिल्ह्यांत या आदेशाचे पालन झाले नाही..Cotton Cultivation: कापूस लागवड घटली अडीच लाख हेक्टरने.त्यामुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवल्याने १७.५ टक्के दंड आकारला जाणार आहे. त्यासोबतच कापूस साठवण पिशव्यांच्या वितरणात दिरंगाई करण्यात आली. तीन ते तेरा आठवड्यांनी साहित्य उशिरा पोहचले. त्याकरिता पुरवठादार मे. माँ भगवती बायोटेक ॲण्ड केमिकल यांच्यावर विलंब शुल्क लादण्यात आले आहे. सात जिल्ह्यांसाठी ही रक्कम तब्बल ६ लाख १६ हजार ४२० रुपये इतकी आहे. यातील पाच लाख ४४ हजार ७८२ रुपयांचा भरणा करण्यात आला असून, उर्वरित १ लाख १६ हजार ६२० रुपये थकित असल्याची माहिती सूत्रांनी दिली..बीड जिल्ह्यात योग्य दर्जाच्या साहित्य पुरवठा केल्याने येथे देयकाची रक्कम दिली जाईल. अकोला, अमरावती, वर्धा येथील साहित्य पडून आहे. त्याची उचल पुरवठादाराला स्वखर्चाने करावी लागेल व साहित्यासाठी कोणतेच देयक अदा केले जाणार नाही. जालना, संभाजीनगर, चंद्रपूर जिल्ह्यांत दर्जाहीन साहित्याचा पुरवठा आणि वितरण झाले. या तीन जिल्ह्यांत देयक रक्कम अदा केली जाणार असली तरी त्यावर १७.५ टक्के दंड आकारणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.