Yavatmal News: रासायनिक खतांसोबतच कीटकनाशकांच्या विक्रीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. याअंतर्गत परवाना अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. .जिल्हा भरारी पथकाव्दारे तसेच कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्या सनियंत्रणातील पथकाने जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी केली. यामध्ये ई-पॉस मशीनवरील नोंदी तसेच कृषी केंद्रात प्रत्यक्ष असलेला साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली. अशाप्रकारची अनागोंदी आढळून आलेल्या ६८ कृषी सेवा केंद्रधारकांना या गंभीर प्रकाराबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती..Overprized Fertilizer : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई.त्यासोबतच इतर निविष्ठा विक्री दरम्यान कायद्यातील तरतुदीचे पालन न करण्याचा प्रकारही समोर आला होता. या सर्व प्रकाराबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या विक्रेत्यांविरोधात परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. .Agriculture Technology Center : कर्जत येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र.खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ परवाने तसेच कीटकनाशक अधिनियम १९६८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी चार कीटकनाशक असे एकूण १७ परवानाधारकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली..यंदाच्या हंगामात चार बियाणे, दोन रासायनिक खते व दोन कीटकनाशक याप्रमाणे आठ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला अनधिकृत एचटीबीटी बियाणे प्रकरणी जिल्हयात सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्याआधारे अनधिकृत १०३८ बियाण्यांची पाकिटे जप्त केली गेली. याची किंमत १५.७१ लाख रुपये असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.