Washim News: वाशीम जिल्ह्यात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यासाठी दोन कोटी ७४ लाख ११ हजार रुपये अंदाजित खर्चाचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला .असून या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये एकूण २३८ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत..Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई .दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. भूजल पातळी खालावणे, अपुरा पाऊस आणि वाढती लोकसंख्या यामुळे ही समस्या अधिक तीव्र होत आहे..Water Scarcity: जलसंकटाचे सावट.या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यंदाच्या आराखड्यात विविध स्वरूपाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे..या कृती आराखड्यात विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नळ पाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती तसेच नवीन विंधन विहिरींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रशासनाने हा आराखडा ३० जून २०२६ पर्यंतच्या कालावधीसाठी तयार केला असून त्यासाठी २ कोटी ७४ लाख ११ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.