Solapur News: एकाच गावात १० ते १३ वर्षांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या आणि बदली होऊनही राजकीय वशिल्यामुळे पदभार न सोडणाऱ्या १५ ग्रामसेवकांवर आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईची टांगती तलवार आहे. त्यात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भुजबळ यांचाही समावेश आहे..जिल्हा परिषदेने ५ ते १० वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही काही ग्रामसेवक नव्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही या ग्रामसेवकांनी त्यास दाद दिलेली नाही..MSEDCL Action: थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.राजकीय वशिल्याचा वापर करून अनेक जण आहे त्याच ठिकाणी राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील ग्रामसेवकाच्या विरोधात ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ग्रामसेवक दत्तात्रय भुजबळ हे गेल्या १३ वर्षांपासून भोसे येथे कार्यरत आहेत..Panchayat Administration: ग्रामपंचायत प्रशासन विकासाचा आधारस्तंभ .सात महिन्यांपूर्वी त्यांची बदली होऊनही त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. त्यांच्या कार्यकाळात विविध योजनांच्या नावाखाली मोठा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे ते स्वतः ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत..ग्रामसेवक गेल्या १३ वर्षांपासून एकाच ठिकाणी आहेत. बदली होऊन ७ महिने झाले तरी ते पदभार सोडत नाहीत. दोन दिवसांत त्यांची बदली न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उड्या मारू, आत्मदहन करू.- महादेव तळेकर, ग्रामस्थ, भोसे, ता. पंढरपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.