Maharashtra Farmer e-KYC Update: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. .शासनाच्या निर्देशानुसार आपले सरकार सेवा केंद्रांवर ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. असे असतानाही या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांकडून शंभर रुपयांपर्यंत पैसे वसूल केले जात आहेत..Loan Waiver List Jalna: जालना जिल्ह्यातील कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध.या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण प्रक्रिया आपले सरकार सेवा केंद्रांवर पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्याकडून ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शासनाने याबाबत सर्व सेवा केंद्रांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत..Loan Waiver List: धुळे जिल्हा बँकेचे पात्र आठ हजार शेतकरी जाहीर.योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी तसेच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तातडीने ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. .ई-केवायसी किंवा आधार प्रमाणीकरणासाठी कोणत्याही शेतकऱ्याकडून शुल्क आकारल्याचे आढळल्यास संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्याचा परवाना रद्द करून आवश्यक ती कायदेशीर कारवाईही करण्यात येईल, असे संबंधित प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे..लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी व आधार प्रमाणीकरण ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी कोणत्याही शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा संबंधित केंद्र चालकाविरुद्ध परवाना रद्द करण्यासह आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, निलंगा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.