Sindhudurg Fire News: सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आचरा टेंबवली (ता. मालवण) येथील देवराई प्रकल्पाला गुरूवारी (ता.१९) आग लागली. या आगीत ७ एकरवरील वनौषधी आणि विविध दुर्मिळ वनस्पती जळून मोठे नुकसान झाले. याशिवाय जलवाहिनीदेखील जळाली आहे..मालवण तालुक्यातील आचरा टेंबवली येथे नीलेश सरजोशी यांचा दहा एकर जागेत देवराई प्रकल्प आहे. दहा एकर जागेत त्यांनी देशी वनौषधी वनस्पती आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतीची लागवड केली आहे. सुमारे १८० पेक्षा अधिक प्रकारच्या वनौषधीची त्यांनी लागवड केली होती. या देवराई प्रकल्पाला काल दुपारी आग लागली. कडक उन्हं आणि जोरदार वारा यामुळे आग विझविणे अशक्य होते. दहा एकरपैकी सात एकरमधील हजारो वनौषधी आगीत जळाल्या. लहान वनौषधीचे अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये अश्वगंधा, सर्पगंधा, मुसळी, नडसांची, कोरफड, ब्राम्ही, शतावरी, गुगुळ, एरंड, अडुळसा, निगडी या वनौषधीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे..Cashew Farming: काजू पिकाचा मोहर करपला.झाडे होरपळली, जलवाहिनीचेही नुकसान कडुलिंब, आवळा, अर्जुन, हादगा, बेल, वड, पिंपळ, पायर, जांभूळ, आईन, किरोर, सावर, बांबू यासह कित्येक झाडे होरपळली आहेत. वनौषधींची लागवड आणि संवर्धन या हेतूने काम करीत असलेल्या श्री. सरजोशींचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय प्रकल्पाच्या जलवाहिनीचेदेखील खूप मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली हे मात्र स्पष्ट झालेले नाही..Agro Orchard Management: आंबा, काजू बागांसाठी मोहीम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.