Crop Cutting Experiment : पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक

Crop Insurance : पीक विम्यासाठी तसेच पिकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे महत्त्व असल्याने सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Nanded News : पीक विमा तसेच पिकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे पीक कापणी प्रयोगात अचूकता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले.

ते पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज व आढावा काढण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम सन २०२५-२६ पीक कापणी प्रयोगाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पीक विम्यासाठी तसेच पिकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे महत्त्व असल्याने सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आवश्यक ती दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

Crop Insurance
Crop Insurance: गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २२ अर्ज दाखल

शुक्रवारी (ता. २४) कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन मुख्य सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रशिक्षक श्यामराव बिंगेवार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

या वेळी दत्तकुमार कळसाईत यांनी पीक कापणीचे महत्व विशद केले. पीकविमा नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोगांस विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने नेमून दिलेले पीक कापणी प्रयोग पूर्ण करावेत असे आवाहन त्यांनी केले. मुख्य प्रशिक्षक श्यामराव बिंगेवार यांनी याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

Crop Insurance
Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

कापणी प्रयोगाचे प्लॉट निवडीचे निकष, उत्पादन मोजणी तंत्र, संकलित माहितीचे विश्लेषण व अहवाल सादरीकरणाची पद्धत याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच पीक उत्पादनाचा अचूक अंदाज लावताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका व त्यावर उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली.

या वेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, महसूल, जिल्हा परिषद व कृषी विभागातील पर्यवेक्षकीय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी तहसीलदार विपिन पाटील, सहायक महसूल अधिकारी बाळासाहेब भराडे, तंत्र सल्लागार गोविंद देशमुख, सुप्रिया वायवळ, वसंत जारीकोटे आदींनी परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com