Dr. Madhav Gadgil: निसर्ग रक्षणाचा द्रष्टा मार्गदर्शक!
A Pioneer of Environmental Conservation: निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून नव्हे, तर सहजीवनाची जिवंत व्यवस्था म्हणून पाहण्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देणारे डॉ. माधव गाडगीळ हे भारतीय पर्यावरण चळवळीतील महत्त्वाचे नाव. निसर्गाला जिंकायची नव्हे, तर समजून घ्यायची गोष्ट मानणाऱ्या थोर शास्त्रज्ञांची परंपरा त्यांनी पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीने समृद्ध केली.