Amravati News: सापांसंदर्भात जनजागृती, सर्पमित्रांच्या समस्या, सर्पमित्रांना सापांविषयी अद्ययावत माहिती देण्याच्या उद्देशाने अमरावतीमध्ये सर्पमित्रांचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे..आयोजनाबाबत चेतन भारती यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारीला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ पासून सर्पमित्रांचे संमेलन सुरू होईल. सकाळी आठपासून नोंदणी केली जाईल. या अधिवेशनाला राज्यभरातून जवळपास ५०० सर्पमित्र सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले..Snake Venom Test Kit: विषारी-बिनविषारी सापाची ओळख होणार क्षणात !.समाजसेवक चंद्रकुमार उपाख्य लप्पीभय्या जाजोदिया यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होत असून आमदार रवी राणा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. या संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्पमित्र नीलमकुमार खैरे, अशोक कॅप्टन, राघवेंद्र नांदे, राजा गोळे आदी मान्यवर उपस्थित राहतील..या संमेलनात सापांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन, सापांच्या विविध प्रजाती, त्यांचा अधिवास, वनविभागाचे कायदे, सरकारकडून सर्पमित्रांच्या अपेक्षा यासर्व बाबींवर सखोल चर्चा केली जाणार असल्याचे भारती यांनी सांगितले..Snake Awareness: जनजागृतीमुळे सापांना जीवदान.सर्पमित्रांना मार्गदर्शनसर्पमित्रांच्या या राज्यस्तरीय संमेलनात सर्पमित्रांसाठी वनविभागाकडून नियमावली जाहीर करण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय सर्पमित्रांच्या ज्ञानवृद्धीसाठी विविध अनुभवी सर्पमित्रांचे व्याख्यान, सर्पमित्रांसाठीचे करिअर याबाबत माहिती दिली जाणार आहे..विशेष म्हणजे, सर्पमित्रांनी काय करू नये, हे सुद्धा या अधिवेशनात सांगितले जाणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन सर्पमित्रांना एक नवीन दिशा देणारे ठरणार आहे, असे चेतन भारती व आयोजकांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.