Nashik News: अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान आहे. अशा संकटात शेतकऱ्यांनी वाचलेली पिके अधिकची मजुरी देऊन खळ्यावर आणली. मात्र शेतकऱ्यांचे कष्ट काही समाजकंटकांना पाहवत नसल्याचे समोर आले आहे. खिर्डीसाठे (ता.येवला) येथील मका उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. अज्ञात समाजकंटकाने खळ्यावर २२ एकर क्षेत्रावरील सोंगणी करून आणलेला मक्याला आग लावल्याने जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे..यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसमोर मोठे अडचणीचा ठरला. पिके पाण्यात होती अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी वाल्मीक नागरे यांनी २५ एकरावरील मका प्रति एकरी ७ हजार रुपये मजुरीने सोंगणी करून खळ्यावर आणला होता..Lemon Farmer Loss: लिंबू बागायतदारांवर सात महिन्यांपासून तोट्याचे सावट; अतिवृष्टीमुळे पावसाचा फटका.मात्र सोमवारी पहाटे लागलेल्या आगीमुळे होत्याचे नव्हते झाले. ग्रामस्थांना भल्या पहाटे जाग आली, तेव्हा डोंगराच्या बाजूला ऐकू येणारा आरडाओरडा ऐकू येत होती तर आकाशात झेपावणारे आगडोंब पाहायला मिळाली. २२ एकरातील मक्याची कणसे डोळ्यासमोर जळताना पाहून डोळ्यात नागरे परिवाराच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तर येथे येणारा प्रत्येक जण नुकसान पाहून हळहळत होता..Soybean Farmer's Loss : राज्यातील सोयाबीन उत्पादकांचे पाच हजार कोटींचे नुकसान.नागरे यांनी सांगितले, की सोंगणी करून कणसांची डोंगराजवळ मोकळ्या जागेत साठवणूक करून ठेवली होती. रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकाने तेथे प्रथम मद्यप्राशन केले, नंतर ज्वलनशील पदार्थ टाकून मक्याच्या गंजीला आग लावून तेथून पसार झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घटनेची चाहूल लागली. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आगीत सर्वच मका बेचिराख झाला होता..२५ एकर क्षेत्रातील काढलेली एक हजार क्विंटल मका अज्ञात व्यक्तीनी पेटवून दिली. यात बाजारभावाप्रमाणे व शासकीय पंचनामा तलाठी यांनी केल्याने २० ते २५ लाखांचे अंदाजे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून दोषी कठोर शासन व्हावे. नुकसान भरपाई मिळावी.- वाल्मीक नागरे, नगरसूल शिवार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.