Buldhana News: पती-पत्नीमध्ये उद्भवणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवल्या जाऊ शकतात. हे लक्षात घेत मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ यांच्या संयुक्त पुढाकारातून ‘मराठा पंचायत’ स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक सुसंवाद आणि कौटुंबिक संस्कार पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. .सध्या अनेक कुटुंबे कौटुंबिक वादांमुळे कोर्ट-कचेरीत अडकलेली दिसून येतात. वर्षानुवर्षे चालणाऱ्या खटल्यांमुळे वेळ, पैसा आणि मानसिक शांतता वाया जाते. नाती तुटतात, आयुष्याचा मोठा काळ वादात जातो, तरीही अनेकदा न्याय दूरच राहतो. या विदारक वास्तवाला पर्याय निर्माण करण्यासाठीच मराठा पंचायतीची निर्मिती करण्यात आली आहे..Samruddha Panchayat Raj: शंभर टक्के करवसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार गौरव.या समितीच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली असून, अॅड. साहेबराव एस. मोरे हे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. समाजातील अनुभवी, विश्वासार्ह आणि संवेदनशील व्यक्तींचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. .Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात.समितीच्या सदस्यांमध्ये हरिभाऊ पाटील (भगत), ज्ञानदेवराव हिवाळे (गुरुजी), प्रकाश पाटील, सदाशिव भोईट, सोपान शेलकर आणि निवृत्ती फरपट यांचा समावेश आहे..ज्या कुटुंबांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले असतील, त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारण्यापूर्वी मराठा पंचायतीकडे अर्ज करावा, असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी मलकापूर येथील शिवराय मंगल कार्यालय येथे निवृत्ती फरपट यांच्याकडे अर्ज सादर करावेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.