Solapur News : माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या २० गावांमध्ये आलेल्या पुराला एक महिना उलटला असून, महिन्यानंतरही नदीकाठचा शेतकरी धास्तावलेलाच आहे. शेती पुन्हा वाहीत कशी करायची? पुरात वाहून गेलेली कागदपत्रे? खरवडून गेलेली जमीन कशी मिळवायची? असे प्रश्न आजही शेतकऱ्यांसमोर आहेत. शेतमजुरापुढे रोजगाराचा अजूनही आ वासून आहे..सीनाकाठच्या पुरामुळे वीस गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात अनपेक्षितपणे मोठे संकट आले. पूर व सध्याच्या पावसामुळे शेतातले पाणी आणि चिखल कमी झाला नसल्याने रब्बी हंगामाची पिके शेतकऱ्यांना घेता येणार नाहीत आणि शेतकऱ्याला आजही बांधावर जाण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. .पाणंद रस्ते व शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. शासनाची तातडीची दहा हजार रुपयांची मदत आणि पिकांच्या नुकसानाची मदत बहुतांशी शेतकऱ्यांना मिळाली आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीमध्ये हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्याला या पुरामुळे झालेल्या नुकसान भरून काढण्यास पाच ते सहा वर्षे लागतील अशी शेतकऱ्यांची भावना आहे. .महापुरानंतर शेतकरी आणि ग्रामस्थांना शासन आणि सेवाभावी संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. किराणा सामान किटची मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे. मात्र यामुळे झालेले पुनर्वसन हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज देण्याची व्यवस्था तयार होणे गरजेचे आहे. .Sina River Flood : पूरग्रस्त केवड, वाकाव गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट.जेणेकरून शेतकरी आपली स्वतःची जमीन पेरणी योग्य करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू शकेल. ऊस आणि द्राक्षासारख्या नगदी पिकांमुळे मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडलेले आहे. .Sina River Flood : पुरामुळे ग्रामपंचायतींचे ४७ कोटींचे नुकसान.या पुराने अल्पभूधारक शेतकरी, मोठा बागायतदार, शेतमजूर अशा शेतीशी निगडित असलेल्या सर्वच घटकांचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि मिळालेल्या मदतीमध्ये आणि सेवाभावी संस्थांनी केलेल्या सहकार्यातून शेतकऱ्याचे पूर्णपणे पुनर्वसन होणे शक्य नाही. मात्र अडचणीच्या काळात झालेली मदत ही महत्त्वपूर्ण आहे अशीच भावना शेतकऱ्यांची आहे..शासनाचे पैसे मिळाले पण दिवाळी काय केली नाही. पुरात जितराबं घेऊन जावायाकडं गेलो. पोरगी म्हणाली सगळं पुरात वाहून गेलंय. गावाकडं जाऊन काय करताय. हितचं थांबा दिवाळी हितचं करा. दिवाळी झाल्यावर गावाकडं आलोय. काय रायलं नाही. पण पुना शेती करावी लागेल, जितराबं संभाळावी लागतीलच की, दुसरं काय करणार.- अंकुश राहू सावंत, शेतकरी, वाकाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.