Union Budget: शेती आणि पूरक उद्योगासाठी ‘अर्थपूर्ण’ पाऊल
Budget Analysis 2026: शेती हे नेहमीच केंद्रीय अर्थसंकल्पांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. उपजीविका, अन्नसुरक्षा आणि ग्रामीण मागणी या तिन्ही बाबींमध्ये शेतीची भूमिका निर्णायक असल्यामुळे हा भर साहजिकच आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे शेती संलग्न क्षेत्रे आणि उच्च-मूल्य शेतीकडे दिसलेला स्पष्ट कल.