Dhule News: राष्ट्र सेवा दल व शिक्षक भारती संघटना, धुळे यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त दारफळ व मोहोळ परिसरातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या जवळपास एक लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यासाठी ही मदत पाठविण्यात आली. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते अनिल देवपूरकर व रामदास जगताप यांच्या हस्ते साहित्य रवाना करण्यात आले..या वर्षी अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक गावांचे, शेतीचे तसेच शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे दप्तर, पुस्तके, शैक्षणिक साहित्याचे नुकसान होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले होते. .Farmer Support: पीडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांना १ कोटी २६ लाख रुपये मदत.या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी राज्यभरातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धुळे जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत गोळा केली..Farmer Support: पीडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांना १ कोटी २६ लाख रुपये मदत.पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, त्यांच्यात पुन्हा हास्य- किलबिलाट व अभ्यास सुरू व्हावा, या उद्देशाने धुळे येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ही मदत सोलापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आली..या वेळी राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपी लांडगे, रमेश पवार, दत्ता बागूल, भैय्या पाटील, महेश बोरसे, यतीन पाटील, नितीन जगताप, विवेक खैरनार, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष विनोद रोकडे, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, दिनेश देवरे, वाहक अरविंद वाघ व चालक बापू शिरसाठ आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.