Farmer Subsidy: नागपूर जिल्ह्यातील ९५४ शेतकऱ्यांची मसाला पिकांसाठी लॉटरीद्वारे निवड झाली आहे. मात्र कागदपत्रे अपलोड न केल्याने त्यांचे हेक्टरी ५० टक्क्यांपर्यंतचे अनुदान धोक्यात आले आहे. शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे.