Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर
Sangli Agriculture: सांगली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ९५ टक्के म्हणजेच २ लाख ३४ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, ऑगस्टमधील पावसामुळे सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकांना फटका बसल्याने उत्पादन घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.