Satara News : पावसाच्या उघडिपीने खरीप पेरणीची कामे आटोपली असून जिल्ह्यात (ऊस वगळून) खरिपातील ९३ टक्के पेरणीची कामे उरकली आहे. सर्वाधिक खटाव तालुक्यात ४६ हजार ६६७ हेक्टरवर लागवड झाली आहे. दरात अस्थिरता असला तरी सर्वाधिक सोयाबीन पिकांची पेरणी झालेली आहे. .जिल्ह्यात खरीप हंगामासाठी (ऊस वगळून) दोन लाख ९७ हजार ९१४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी दोन लाख ७७ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या ९२,८७५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८१ हजार ५९३ हेक्टरवर (८८ टक्के) पेरणी झाली आहे. .Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २० लाख ६६ हजार हेक्टरवर पेरा.भाताच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४२ हजार ७२३ हेक्टरवर (८२ टक्के) लागवड झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांत खरिपात बाजरी प्रमुख पीक असून या बाजरीची ३६ हजार ९७४ हेक्टरवर (७३ टक्के) पेरणी झाली आहे. .खरिपात ज्वारी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्वारीची आतापर्यंत ५२२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाची लागवड सुरू असून, सध्या उसाच्या रोपाची लागवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. आडसाली उसाची २८ हजार ८०६ हेक्टरवर लागवड उरकली आहे..Kharif Sowing 2025 : कापूस, सोयाबीन, तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ; मक्याला मात्र पसंती.मशागत न झाल्याने तणाचे प्रमाण वाढले असल्याने पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांतील आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून हलका ते मध्यम पाऊस सुरू असल्याने पिकांना फायदेशीर ठरणार आहे. धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे..तालुकानिहाय पेरणी क्षेत्र हेक्टरमध्येसातारा २५,३४८, जावळी १५,२१०, पाटण ४२,३०१, कऱ्हाड ३१,१२८, कोरेगाव २३,००१, खटाव ४६,६६७, माण ४०,९५४, फलटण १८,४९१, खंडाळा १५,६८०, वाई १४,८८६, महाबळेश्वर ४,१६७..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.