Pune News: देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून आठव्या वेतन आयोगामुळे त्यांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग संपल्यानंतर आता नव्या आयोगाअंतर्गत वेतनरचना लागू होणार आहे. पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पासूनचा थकीत एरियर मिळण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार ही वाढ ठरणार असून काही कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा एरियर मिळू शकतो. मात्र, याबाबत सरकारची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे..फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?फिटमेंट फॅक्टर हि एक संख्या आहे. जी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या बेसिक पगाराला गुणाकार करून नवीन बेसिक पगार ठरवण्यासाठी वापरते. म्हणजे तुमचा सध्याचा बेसिक पगार × फिटमेंट फॅक्टर = नवीन बेसिक पगार.8th Pay Commission: मूळ पगारात महागाई भत्ता विलीन होणार का? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती.१२ ते २४ महिन्यांचा एरियर एकरकमी मिळणार…मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी प्रत्यक्षात २०२७ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासूनचा एरियर मिळू शकतो. म्हणजेच १२ ते २४ महिन्यांचा एरियर एकरकमी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा होऊ शकतात.एरियर म्हणजे थकीत बकाया रक्कम किंवा मागील काळातील देय रक्कम जी वेळेवर दिली गेली नाही आणि ती आता थकीत झाली आहे..सरकार जर फिटमेंट फॅक्टर २.० ते २.५७ दरम्यान ठेवत असेल, तर बेसिक पगारात मोठी वाढ होईल. उदाहरणार्थ:लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार २.० फिटमेंटवर सुमारे ३६ हजार, २.१५ वर ३८,७०० आणि २.५७ वर ४६,२६० रुपये होऊ शकतो.लेव्हल २ कर्मचाऱ्यांना २.० वर ३९,८००, २.१५ वर ४२,७८५ आणि २.५७ वर ५१,१४३ रुपये मिळू शकतात..8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार.लेव्हल ३ कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार २.० वर ४३,४००, २.१५ वर ४६,६५५ आणि २.५७ वर ५५,७६९ रुपये होऊ शकतो.लेव्हल ४ कर्मचाऱ्यांना २.० वर सुमारे ५१ हजार आणि २.५७ वर ६५,५३५ रुपये बेसिक पगार मिळण्याची शक्यता आहे..एकूणच, आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून, एरियरच्या माध्यमातूनही मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. आता सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.