Nanded News: नांदेड जिल्ह्यात एप्रिल २०२५ ते आक्टोबरपर्यंत विविध कारणांमुळे शेतकरी अपघाताच्या २१० घटना घडल्या आहेत. तर मागील ८१ प्रकरणे कागदपत्राअभावी प्रलंबित होते. या २९१ घटनांमधील १४१ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तब्बल ६९ प्रस्ताव कागदपत्राअभावी अपूर्ण आहेत. ५१ प्रस्ताव तालुकास्तरीय समितीच्या मंजुरीअभावी प्रलंबीत आहेत. यातील पात्र १४१ प्रस्तावांपेकी ५४ शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी सात लाखांचा निधी वितरित करण्यात आला. परंतु शासनाकडून अद्याप निधी मिळाल्या नसल्याने अद्याप ८५ प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती सूत्राने दिली..शेती व्यवसाय करताना विविध कारणाने शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तसेच कायमचे अपंगत्व आले तर त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख सानुग्रह अनुदान देण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकारने १९ एप्रिल २०२३ रोजी सुरू केली. विविध कारणांनी अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. यामध्ये १३ प्रकारच्या अपघाताचा समावेश करण्यात आला आहे. .Farmer Accident Scheme : शेतकरी अपघातग्रस्तांचे वारस निधीअभावी वाऱ्यावर.रस्ते अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व अन्य कोणत्याही अपघाताचा यात समावेश करण्यात आला आहे. .Farmer Accident Insurance Scheme : ‘अपघात विमा’च्या बैठकीत ६ प्रकरणे मंजूर.ही योजना सुरू झाल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्यातील १६ तालुक्यांतून अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झाले. दरम्यान एप्रिल २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत जिल्ह्यातून या योजनेसाठी २१० प्रस्ताव दाखल झाले आहेत. तर मागील वर्षातील ८१ प्रकरण प्रलंबित होती. एकूण २९१ प्रकरणांतील ३० प्रस्ताव नामंजूर झाली आहेत. तर १४१ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. यातील तब्बल ६९ प्रस्ताव कागदपत्राअभावी प्रलंबित आहेत. यासोबतच तहसीलदार अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीच्या मंजुरीअभावी ५१ प्रस्ताव पडून आहेत. मंजूर १४१ प्रस्तावांनुसार जिल्ह्याला दोन कोटी ८२ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. परंतु मागील राज्य शासनाने निधी एक कोटी सात लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे यातील ५४ प्रकरणात अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक कोटी सात लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले. अद्याप ८५ प्रकरणांत एक कोटी ७० लाखांचा निधी शासनाकडे प्रलंबीत आहे..प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांना वेळ नाहीजिल्ह्यात एप्रिल २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत शेतकरी अपघाताच्या २१० घटना घडल्या आहेत. यातील ५१ प्रस्ताव तहसीलदार अध्यक्ष असलेल्या तालुकास्तरीय समितीच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आले. परंतु हे प्रस्ताव तहसीलदारांना वेळ मिळत नसल्याने प्रलंबीत राहिल्याची गंभीर बाब समोर आहे. यात मुखेड दोन, भोकर १२, नायगाव आठ, अर्धापूर सहा, कंधार दोन, हिमायतनगर तीन, बिलोली चार, उमरी एक, देगलूर धर्माबाद चार, उमरी एक, नांदेड तीन, लोहा चार असे एकूण ५१ प्रस्ताव प्रलंबित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.