Ahilyanagar News: सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीनंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ हजार ५०६ कोटी ४१ लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे. .त्यापैकी ५ लाख ४० हजार ७५६ शेतकऱ्यांपर्यंत १ हजार २ कोटी २७ लाख रुपये अनुदान पोहोचले आहे. मात्र ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्याने ८५ हजार ५२८ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनानेच ही माहिती देत ई-केवायसी, अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे..Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?.जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पावसाने साडेआठ लाख शेतकऱ्यांचे सहा लाख हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. त्यासाठी शासनाने १ हजार ५०६ कोटी ११ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानाची रक्कम वर्ग केली जात आहे..आतापर्यंत अहिल्यानगर तालुक्यात ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५५ लाख रुपये, अकोलेमध्ये १ हजार ८९ शेतकऱ्यांना ७८ लाख रुपये, जामखेडमध्ये ३२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ६० कोटी २२ लाख रुपये, कर्जत तालुक्यात ४९ हजार ७८६ शेतकऱ्यांना १०२ कोटी ७५ लाख रुपये, कोपरगावमध्ये ३२ हजार ६९८ शेतकऱ्यांना ४८ कोटी ६० लाख रुपये,.Rabi Subsidy Issue: अतिवृष्टीनंतर रब्बीच्याही अनुदानाचा घोळ.नेवासा तालुक्यात ७१ हजार ६२२ शेतकऱ्यांना १४६ कोटी ७८ लाख रुपये, पारनेरमध्ये ३७ हजार ५६४ शेतकऱ्यांना ५९ कोटी ६३ लाख रुपये, पाथर्डी तालुक्यात ५१ हजार ९६४ शेतकऱ्यांना १०१ कोटी ६६ लाख रुपये, राहाता तालुक्यात ३२ हजार ९५२ शेतकऱ्यांना ६० कोटी ८२ लाख रुपये,.राहुरीमध्ये ४६ हजार १५३ शेतकऱ्यांना ८१ कोटी ७६ लाख रुपये, संगमनेरमध्ये १८ हजार ९७९ शेतकऱ्यांना २७ कोटी १८ लाख रुपये, शेवगावमध्ये ५० हजार ४६० शेतकऱ्यांना ११० कोटी ८६ लाख रुपये, श्रीगोंदा तालुक्यात ४६ हजार ७१६ शेतकऱ्यांना ७५ कोटी ३२ लाख रुपये, श्रीरामपूरमध्ये २८ हजार ६१८ शेतकऱ्यांना ५१ कोटी ३६ लाख रुपये मदत मिळाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.