Amravati News: अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत यंदा मुबलक पाणीसाठा असून रब्बी हंगामासाठी पाच पाळ्या पाणी देणे शक्य असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पाणी मागणीचे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी शेतकऱ्यांकडून त्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत सद्यःस्थितीत ८४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे..अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह सात मध्यम व ४८ लघू प्रकल्पांतून रब्बी हंगामात सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी पाणी मागणीचे अर्ज शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडे करावे लागतात..यंदा पावसाची सरासरी अधिक राहिल्याने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शेतजमिनीत ओलाव्याचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी मागणी कमी केली आहे..Water Storage: रब्बीची चिंता मिटली! देशातील प्रमुख धरणांत ९० टक्के पाणीसाठा.दरम्यान, जिल्ह्यात सद्यःस्थितीत एक मोठ्या, सात मध्यम व ४८ लघू प्रकल्प मिळून ८८६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ८७१ दलघमी साठा होता. या प्रकल्पांतून सिंचनासह नागरी व औद्योगिक पाणीपुरवठा केल्या जातो. .Water Storage : कृष्णा खोऱ्यात धरणांत पाणीसाठा मुबलक.अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पांत ५१४ दलघमी पाणीसाठा असून सात मध्यम प्रकल्पांत १७६ दलघमी व ४८ लघुप्रकल्पांत १९५ दलघमी साठा उपलब्धआहे..रब्बी हंगामात जिल्ह्यात गहू व हरभरा ही दोन मुख्य पिके असून गव्हाला पाच तर हरभऱ्यास दोन पाळ्या पाणी दिल्या जाते. यासाठी सिंचन विभागाकडून कालव्यांच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येते. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.