Mumbai News: नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंगळवारी (ता.११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. .तसेच, धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीलाही मान्यता देण्यात आली. नाशिक जिल्हा बँकेला सर्वाधिक ६७२ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. नागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात येणार आहे..Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ५ निर्णय; हिंगोली जिल्ह्यातील दोन साठवण तलावाच्या निधीसाठी मान्यता.भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांचे पुनर्भांडवलीकरण व पुनरूज्जीवन करण्याबाबत शासनास कळवले होते. त्यानुसार, आज या तिन्ही बँकांना भागभांडवल म्हणून अर्थसाह्य मंजूर करण्यात आले. या बँका डबघाईला आल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू होते..Satara Jilha Bank: सातारा जिल्हा बँकेतर्फे सौर यंत्रासाठी कर्ज योजना.ठेवी कमी झाल्याने पीक कर्जवाटप आणि वसुलीवर मोठा परिणाम होत होता. शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीवरच सेवाविकास संस्थांचेही अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे या बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय अर्थसहाय्य भागभांडवल स्वरूपात मंजूर करण्यात आले..नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात ३३६ कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात ३३६ कोटी वितरीत करण्यासही मान्यता देण्यात आली. नाशिक आणि नागपूर जिल्हा बँका सध्या प्रशासकांच्या अखत्यारीत कार्यरत आहेत. धाराशिव जिल्हा बँकेवर संचालक मंडळ आहे. मात्र बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने तिचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीसाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यासही मान्यता देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.