Ahilyanagar News : महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. .शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान योजना योजना सुरू केली. त्यातून वर्षासाठी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. त्यानंतर राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून प्रती वर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. .Namo Shetkari Mahasamman Scheme: नमो शेतकरी महासन्मानसाठी १९३२ कोटींच्या निधीला मंजुरी.या योजनेचा सातवा हप्ता दिला आहे. एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान या हप्त्यात देण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेस पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळतो. .Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी’चा हप्ता ९१.६५ लाख शेतकऱ्यांना वितरित.केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य सरकारकडून आणखी ६ हजार रुपये अनुदान मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा लाभ मिळतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे..तालुकानिहाय शेतकरी... कंसात मिळालेली रक्कमअकोले ः ३४८५७ (६ कोटी ९७ लाख)जामखेड ः २९०२७ (५ कोटी ८० लाखकर्जत ः ४३५५९ (८ कोटी ७१ लाख)कोपरगाव ः २९५८६ (५ कोटी ९१ लाख)अहिल्यानगर ः ३०९३६ (६ कोटी १८ लाख)नेवासा ः ५४२०२ (१० कोटी ८४ लाख)पारनेर ः ५०२७१ (१० कोटी ५ लाख)पाथर्डी ः ३९८३५ (७ कोटी ९६ लाखराहाता ः २४०७१ (४ कोटी ८१ लाख)राहुरी ः ३८५२७ (७ कोटी ७० लाख)संगमनेर ः ५९०५२ (११ कोटी ७१ लाख)श्रीरामपूर ः २२३२५ (४ कोटी ४६ लाख)शेवगाव ः ४१८३८ (८ कोटी ३६ लाख)श्रीगोंदा ः ५०४७३ (१० कोटी ९ लाख).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.