Nashik News : सिन्नर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत सदस्यांनी मुदत संपूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १०-१ ‘अ’नुसार या सदस्यांना अपात्र ठरविले. या कारवाईमुळे सिन्नरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे..ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार तालुक्यात २०१९ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडणूक लढत उमेदवारांनी विजय संपादन केला होता. .Gram Panchayat Development : ग्रामपंचायतींचा विकास खोळंबला .या उमेदवारांनी नियमानुसार विहित मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबत कागदपत्रे जमा करणे गरजेचे होते; परंतु उमेदवारांनी ही कागदपत्रे जमा केली नाहीत. शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही या सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. .अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पडताळणीत संधी देऊनही या सदस्यांनी त्यांचे जात पडताळणीचे वैध प्रमाणपत्र व कागदपत्रे सादर केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी या सर्व सदस्यांना अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहेत..Gram Panchayat Tax Dues : सहाशे ग्रामपंचायतींकडे थकले ४५ कोटी.जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात येवला तालुक्यातील सदस्यांना जातपडताळणीअभावी अपात्र घोषित केले होते. मात्र, या सदस्यांनी न्यायालयातून त्यावर स्थगिती मिळवली होती. त्यानंतर आता सिन्नरमध्ये एकाच वेळी ७९ सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने अनेक गावांच्या कारभारावर परिणाम होणार आहे..या गावांमधील सदस्य अपात्रसोनांबे, विंचूर दळवी, चंद्रपूर, मुसळगाव, निमगाव देवपूर, धोंडबार, सांगवी, धारणगाव, ब्राह्मणवाडे, मऱ्हळ खुर्द, देशवंडी, निऱ्हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, औंढेवाडी, आटकवडे, सावता माळीनगर, दत्तनगर, पांगरी बुद्रुक, कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, मलढोण, जामगाव, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, वडझिरे, हिवरे, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बुद्रुक, कुंदेवाडी, सोनगिरी, कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी, घोटेवाडी, फर्दापूर, दहीवाडी, दातली, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खुर्द, कोमलवाडी बोरखिंड, सरदवाडी, पांढुर्ली या गावांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.