Cotton Rate : खानदेशात कापसाला ७८०० ते ८१०० रुपये दर

खानदेशात सुमारे ४० ते ४५ टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Jalgaon News : खानदेशात सध्या रोज पाच हजार गाठींची निर्मिती (एक गाठ १७० किलो रुई) होत आहे. खेडा किंवा थेट खरेदीत कापसाला ७८०० ते ८०००, ८१०० रुपये प्रति क्विंटलचा दर (Cotton Rate) मिळत आहे.

कापूस आवक (Cotton Arrival) स्थिर आहे; मात्र दर अस्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी किंवा संभ्रम आहे. शेतकरी संघटनेने ‘सेबी’समोर कापूस वायदा बाजार सुरू करण्यासाठी आंदोलन केले, पण त्याचा उपयोग काय, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

खानदेशात सुमारे ४० ते ४५ टक्के कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे भागात कमाल शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापसाची विक्री केली आहे.

जळगावात पारोळा, अमळनेर, चोपडा, जामनेर या भागांतही अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली.

Cotton Rate
Cotton Rate : शेतकऱ्यांकडील अधिकच्या कापूस साठ्याने दर अस्थिर

कापूस उत्पादन कमी आहे. कोरडवाहू क्षेत्रातून उत्पादन कमी आहे. फक्त पूर्वहंगामी क्षेत्रात उत्पादनाची स्थिती बरी आहे. जळगाव जिल्ह्यात यावल, जळगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, भडगाव आदी भागांत निम्म्या कापसाची विक्री पूर्ण झाली आहे.

कापसाची खेडा खरेदी सुरू आहे. काही कारखानदार एजंटच्या मदतीने ही खरेदी करून घेत आहेत. या खरेदीत कापसाला ७८००, ८००० ते ८१०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.

फरदड किंवा कमी दर्जाच्या कापसाला ७८०० चा दर आहे. उत्पादक शेतकऱ्यांना हा दर परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण शेतकऱ्यांना कापूस उत्पादन खर्च प्रति क्विंटल साडेचार ते पाच हजार रुपये आला आहे.

परंतु निकड लक्षात घेऊन शेतकरी सध्या आपल्याकडील २० ते ३० टक्के कापसाची विक्री करीत आहेत. खानदेशात काही जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू आहेत. परंतु काही कारखानदार बाजारातील अस्थिर स्थिती लक्षात घेऊन कापूस खरेदी व प्रक्रिया टाळत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com