Satara News: सातारा जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ७६ ग्रामपंचायती ओडीएफ प्लस मॉडेल गावे म्हणून घोषित केली आहेत. या कामांमुळे इतर गावांना प्रेरणा मिळाली असून, उर्वरित गावांचीही स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे..जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ओडीएफ प्लसमध्ये चांगली कामगिरी केली आहे. देशभरात ओडीएफ प्लस गावांची दर महिन्याला चाचपणी होते. ओडीएफ प्लससाठी पात्र ठरलेल्या गावांची माहिती ऑनलाइन भरण्यात येते. त्याची प्रत्यक्ष चाचपणी झाल्यानंतर ते गाव ओडीएफ प्लस म्हणून घोषित करतात..Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम.त्यानुसार जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आलेवाडी, आंधारी कास, धुंद, कुंभारगणी, रुईघर, सोनगाव, खटाव तालुक्यातील भोसरे, जाखणगाव, लाडेगाव, पांढरवाडी, शेनवडी, महाबळेश्वर तालुक्यातील पारूट, माण तालुक्यातील दिवडी, पाटण तालुक्यातील गोकूळ तर्फे हेळवाक, जमादारवाडी, जिंती, काळगाव, कुंभारगाव, कालवडी, कवारवाडी, मराठवाडी, म्हावशी, नाडे, नारळवाडी, नवासारखाडी, निसरे, साईकडे, सळवे, सुपुगडेवाडी, तारळे, येराड, फलटण तालुक्यातील गोळेगाव पु., खुंटे, मुंजवडी, पिंपरद, राजुरी, राबडी बु..Swachh Bharat Mission: भोकणीत साकारणार सर्वांत मोठा मैला.सातारा तालुक्यातील धोंडेवाडी, गोवे, खावली, कोंढवली, कुरुण, कुस बु., कुशी, महागाव, माळ्याचीवाडी, म्हसवे, निनाम, पेठेश्वरनगर, पेट्री अनावळे, फडतरवाडी, पिलाणीवाडी, सांबरवाडी, संगम माहुली, सासपडे, शिवाजीनगर, वाई तालुक्यातील आसले, आसरे, बेलमाची, बोरीव, पांडे, उडतारे, वेळे, वासोळे गावांची निवड झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांनी दिली.जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विविध राबविले जात आहेत..पाणी व स्वच्छता विभागासह ग्रामपंचायत विभागाने गावपातळीवर सातत्याने पाठपुरावा करत ओडीएफ प्लसमधील निकषांची पूर्तता केली. प्लॅस्टिक कचरा संकलन, शौचालये, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला.- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.