Fish Conservation: प्रजनन काळात मत्स्यसाठ्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला होता. यंदा मासेमारीचा हंगाम उशिरा असल्याने ७६ दिवसांच्या बंदीनंतर डहाणू, बोर्डी, आगर, नरपड परिसरातील बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. .दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीवर बंदी असते. मात्र, मत्स्यसाठ्याचे संरक्षण, मासळीच्या प्रजननासाठी यंदा हा कालावधी ७६ दिवसांचा करण्यात आला. त्यामुळे रविवारपासून (ता.१६)अधिकृतपणे मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने डहाणू, बोर्डी, आगर, नरपड परिसरातील मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे..Raigad Fishing Ban: खोल समुद्रातील मासेमारी १ जूनपासून बंद.बंदीकाळात जय्यत तयारीमासेमारी बंदीच्या काळात किनारपट्टीवरील मच्छीमार बोटींची दुरुस्ती, जाळी तयार करणे, दुरुस्ती करणे, बोटींना रंग देणे तसेच मासेमारीसाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव करण्यात व्यस्त होते..Fishing Season: परराज्यांतील मच्छीमारांची नोंद.ताज्या मासळीची खवय्यांसाठी पर्वणीनारळी पौर्णिमेनंतरच समुद्र देवतेचे पूजन केल्यानंतर अनेक बोटी मासेमारीसाठी समुद्रात जातात. यंदाही पारंपरिक पद्धतीनुसार अनेक मच्छीमार समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला सुरुवात करणार आहेत. .अनेक लहान मच्छीमारांनीही समुद्रात उतरण्यास सुरुवात केल्याने खवय्यांसाठी ताजे मासे बाजारात उपलब्ध झाले असल्याने खवय्यांसाठी पर्वणी ठरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.