Sangli News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. त्यात येत्या आठवड्यात जिल्ह्यातील गावागावांतील पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मोहीम सुरू झाली आहे. .सुमारे ७०० पाणंद रस्ते या अभियानामुळे मोकळा श्वास घेणार आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे नियोजन झाले असून, कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात ७२९ गावे आहेत. जानेवारीपासून या गावांतील पाणंद रस्त्यांबाबत अनेक कामे मार्गी लागली आहे. जवळपास ६८० रस्त्यांचे वाद मिटले आहेत. .Farm Road: रस्ता मागणी करता कोणती काळजी घ्यावी? .ते रस्ते मोकळे झाले आहेत. आता या विशेष अभियानातून आणखी किमान ७०० रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी तेथे जातील, शेतकऱ्यांशी संवाद साधतील, नकाशे तपासतील, अतिक्रमणे हटवतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे यावे, पाणंद रस्ते हे सर्वांच्या सोयीसाठीच आहेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून याआधीच करण्यात आले आहे..Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन.लोकांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी केली जाणार आहे. या अभियानात केवळ रस्ते अतिक्रमणमुक्त करून न थांबता त्याची ग्रामपंचायतीच्या मालकी सदरी इतर हक्कांत नोंद घालून कायमचा वाद मिटवण्याचे धोरण राबवण्यात येणार आहे. याआधी ज्या रस्त्यांचे वाद मिटवले गेले, त्यांच्याही नोंदी या सप्ताहातच घातल्या जाणार आहेत. .पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा देशी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडे दिली जाणार आहेत, प्रत्येक मंडलातील एका गावात विशेष मोहीमदेखील राबवली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.