Maharashtra Agriculture : सोलापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २६ हजार ५५३ पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत १८ हजार ५७३ म्हणजे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांचे आधार सीडिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. अजूनही ७ हजार ६९० शेतकऱ्यांचे आधार सीडिंग बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली..श्री. एस.कार्तिकेयन म्हणाले, की योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहे. आधार सीडिंग पूर्ण झाल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर आलेला संदेश तपासावा..Nashik Loan Waiver : नाशिकमध्ये कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग.जवळच्या तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायतीत किंवा बँकेत जाऊन प्रसिद्ध केलेल्या यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. त्यासाठी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नावासमोरील 'विशेष क्रमांक' आणि आधार कार्ड घेऊन जवळच्या महा ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्रात जावे. .Farm Loan Waiver: लाभार्थी शेतकरी मयत असल्यास वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल का? .तेथे विनाशुल्क आधार सीडिंग करून दिले जाईल. सीडिंग प्रक्रिया पूर्ण होताच लाभ वेळेत खात्यावर जमा होईल. आधार सीडिंग करताना कोणतीही समस्या आल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदारांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. .या यादीतील काही शेतकरी बांधव मयत झाले असल्यास, त्यांच्या वारसांची योग्य नोंदणी करून घेतल्यानंतर वारसांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.