Pune News: जुन्नर वन विभागात बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्याने, ते कमी करण्यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ कोटी रुपये दिले. त्यातून मोठ्या प्रमाणात पिंजरे तयार करण्यात आले, त्या पिंजऱ्यांच्या मदतीतून आतापर्यंत ६८ बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आजपर्यंत एवढ्या कमी काळात एवढे बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आल्यामुळे पुढील काळात बिबटे आणि मनुष्य संघर्ष कमी होण्यात मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. .या मोहिमेत जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या विशेष प्रयत्न असल्याचेही श्री. डुडी यांनी सांगितले. जुन्नर वन विभागात जुन्नर, ओतूर, शिरुर, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर आणि चाकण वनपरिक्षेत्राचा समावेश होतो..Leopard Rescue: बिबट्या कोरड्या विहिरीत.बिबट हल्ल्यात २०२५-२६ या वर्षात पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांना नुकसान भरपाई म्हणून ६५ लाख रुपये, तसेच जखमी ५ नागरिकांना २ लाख १८ हजार ९६४ रुपये, मृत १६५७ जनावरांकरिता भरपाईचे १ कोटी ६१ लाख १६ हजार ८८९ रुपये तसेच १७ हेक्टर ७ आर पिकांचे नुकसान झाले असून त्यासाठी ९ लाख ७९ हजार ९०० रुपये असे मिळून २ कोटी ३८ लाख १५ हजार ७५३ रुपये अदा करण्यात आले आहेत..जुन्नर वन विभागातील मानव व बिबट संघर्ष टाळण्याबरोबरच वन्यप्राणी बिबटचे व्यवस्थापन होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षांत १८५ बिबट-बछडे पुनर्मिलन करण्यात आले आहे. गावांमध्ये वन कर्मचाऱ्यांनामार्फत गस्त, नागरिकांचे प्रबोधन, स्थानिक लोकांच्या सहभागातून जलद बचाव पथकांची निर्मिती, त्यांच्याकडून गस्त व प्रबोधन करण्यात येत आहे..Leopard Attack: बिबट्याच्या दहशतीनं शेती उजाड, रेस्क्यू सेंटर बनवा, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधानभवनात.कलापथक यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांत तसेच शाळांमधून सुमारे ४० कार्यक्रम करण्यात आले आहेत. कलापथकाचे प्रमुख श्री. सौमित्र यांच्यामार्फत वेगवेगळ्या ५० गावांमध्ये बिबट जनजागृतीचे विशेष वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे..बिबट्याच्या हल्ल्यांपासून घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती देणारे पोस्टर्स, घडीपत्रके, कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी पथकातील सदस्य तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पथक यांच्या समन्वयाने वन्यप्राणी रेस्क्यू करण्याची कार्यवाही करण्यात येते. प्राथमिक बचाव पथकातील एकूण ४०० सदस्य कार्यरत आहेत..नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावितबिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीजपुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन ४ बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे, असेही श्री. डुडी म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.