Chhatrapati Sambhajinagar News: कन्नड तालुक्यातील पळसगाव, चिकलठाण, हतनूर, अंधानेर फाटा, करंजखेडा, खरेदी-विक्री संघ, वासडी व नाचनवेल या आठ केंद्रांवर शासकीय भावाने मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होती. सोमवारी (ता. १५) शेवटच्या दिवसापर्यंत ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे..आता शासकीय मका खरेदीला नेमका मुहूर्त कधी लागणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने मकाला हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शासकीय मका खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने गरजू शेतकऱ्यांना आर्थिक गरज भागवण्यासाठी नाइलाजाने मका कवडीमोल भावात खासगी बाजारात विकावा लागत आहे. त्यामुळे शासकीय मका खरेदी केंद्रे लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे..Maize Procurement: मका खरेदी संथ गतीने .शासनाने मकाला २४०० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. तालुक्यात आठ ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू केल्यामुळे खासगी बाजारात मकाचे दर काही प्रमाणात वाढले असून सध्या १५०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे..Maize Price Crash: मका उत्पादकांची गोची.केंद्रनिहाय झालेली नोंदणीपळसगाव २३०चिकलठाण ५५हतनूर ४५अंधानेर फाटा १४०करंजखेडा ५७खरेदी-विक्री संघ १३०वासडी ३नाचनवेल १एकूण ६६१.MSPMaizeआमच्या सहकारी संस्थेकडून मका खरेदीची तयारी पूर्ण झाली आहे. पणनकडून आदेश मिळताच नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या मका खरेदीस आम्ही सुरवात करू.-कैलास अकोलकर, अध्यक्ष, सहकारी संस्था, हतनूर.वासडी, नाचनवेल येथे नोंदणी केंद्रे सुरू केली आहेत. देवगाव रंगारी येथे नेटच्या अडचणीमुळे नोंदणी होऊ शकली नाही. तारीख वाढविण्यासाठी मागणी करणार आहोत.- पांडुरंग घुगे, संचालक, महाराष्ट्र राज्य फेडरेशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.