Buldana News: मलकापूर, जि, बुलडाणा तालुक्यात रब्बी पिकांच्या लागवडीला वेग आला आहे. आजवर मलकापूर तालुक्यातील पाचही मंडळामध्ये सरासरी १० हजार २१७.६५ हेक्टर क्षेत्रापैकी ६ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली. सरासरीच्या ६६.६४ टक्के एवढी लागवड झाली आहे..रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला सध्या वेग आला आहे. हिवाळ्याच्या दिवसात रब्बी ज्वारी, बागायती गहू, रब्बी मका, तृणधान्य, हरभरा, कडधान्य, अन्नधान्य आदी पिकांची लागवड शेतकरी करीत आहेत. यावर्षी मुबलक स्वरूपात पाऊस झाल्याने थंडीचा जोरही बऱ्यापैकी टिकून आहे..Rabi Sowing: चंद्रपुरात रब्बी लागवड क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर.त्यामुळे पिकांना पोषक वातावरणही निर्माण झाले असून गहु, हरभऱ्याची लागवड वाढली. मलकापूर तालुक्यातील रब्बी पिकांच्या लागवडीचा विचार केला असता तालुक्यातील पाच महसूल मंडळामध्ये पेरणी योग्य सरासरी १० हजार २१७.६५ हेक्टर क्षेत्रापैकी ६८०९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. .Rabi Sowing: लातूर विभागात रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात.यामध्ये रब्बी ज्वारी सरासरी पेरणी क्षेत्र १६४.५३ हेक्टर असून त्यापैकी २१ हेक्टर (१२.७८ टक्के), बागायती गहू २३५३.९३ हेक्टर पैकी ८३५ हेक्टर (३७.६० टक्के), रब्बी मका २३४० हेक्टर पैकी २०९१ हेक्टर (८९.३६ टक्के), तृणधान्य ४८८०.४६ हेक्टर पैकी २९९७ हेक्टर (६१.४१ टक्के), हरभरा ५३१८ हेक्टरपैकी ३८२ हेक्टर (७१.६८ टक्के), कडधान्य १०२०६.५५ हेक्टरपैकी ६८०९ हेक्टर (६६.७१ टक्के) अशाप्रकारे ३ डिसेंबरपर्यंत रब्बीची पेरणी आटोपली आहे..मंडळनिहाय क्षेत्रमहसूल मंडळनिहाय विचार करता मलकापूर मंडळात १९८३.७२ सरासरी क्षेत्रापैकी १८५०हेक्टर, दाताळा मंडळात २०४७.१० हेक्टरपैकी १३९४ हेक्टर, जांभुळधाबा मंडळात २०३०.६६ हेक्टरपैकी १३८० हेक्टर, नरवेल मंडळात २०८७.४४ हेक्टरपैकी १११५ हेक्टर, धरणगाव मंडळात २०६८.७३ हेक्टरपैकी १०७० हेक्टरवर रब्बीची पेरणी सध्या झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.