Childrens Malnutrition: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत
Child Health: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५१ कुपोषित बालकांना येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पंचसूत्री आराखडा जाहीर केला आहे. महिला व बालविकास, आरोग्य, ग्रामविकास आणि महसूल विभागांच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.