Parbhani News: परभणी जिल्ह्यातील दूधना नदीवरील ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पात गुरुवारी (ता. २९) सकाळी १५३.८८३ दशलक्षघनमी नुसार ६३.५४ टक्के पाणीसाठा होता. कालव्याद्वारे सोडलेली आवर्तने, उपसा तसेच बाष्पीभवन यामुळे या धरणातील पाणीसाठा कमी होत आहे..निम्न दुधना धरणातील प्रकल्पीय साठा ३४४.८०० दलघमी, तर प्रकल्पीय जिवंत साठा २४२.२०० दलघमी आहे. धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हे धरण २०२५ मध्ये भरले होते. या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बीत सिंचन आवर्तने सोडण्यात आली. .Water Storage: नांदेडमधील प्रकल्पांत ८५ टक्के पाणीसाठा शिल्लक.उपसा सिंचन योजना तसेच सेलू शहर, इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनाद्वारे पाणी वापर केला जात असल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.आजवर डाव्या कालव्यातून ३.७५६ दलघमी आणि उजव्या कालव्यातून ३.२३२ दलघमी पाणी सोडण्यात आले. .Water Storage: मराठवाड्यात विविध प्रकल्पांत पाणीसाठा ९४ टक्क्यांवर.सांडव्यातून १ जून २०२५ पासून आत्तापर्यंत ४८१.५३० दलघमी पाणी सोडण्यात आले.बाष्पीभवन व इतर व्यय (प्रकल्प अहवालानुसार २.९४ मिमी प्रतिदिन नुसार ०.१० दलघमी आणि ०.१० दलघमी आहे.बिगरसिंचन पाणीवापर ०.०३१० दलघमी आहे. .धरण क्षेत्रात एकूण ९३४ मिमी पाऊस झाला.१ जून २०२५ पासून या धरणात ५९५ दलघमी येवा झाला. मागील वर्षी २९ जानेवारीला १४०.१६३ दलघमी नुसार ५७.८७ टक्के पाणीसाठा होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.