Ahilyanagar News: यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. .या मदतीचे वितरण पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत..Farmers Relief: प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिलासा.अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामात राज्यात व जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजल्या होत्या अथवा खचल्या होत्या. यामुळे रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर केली आहे..Farmer Relief: अकरा शेतकऱ्यांना १ कोटी ६ लाखांची मदत.जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या जामखेड तालुक्यातील १२८ विहिरींसाठी १८ लाख ६८ हजार ७८ रुपये, शेवगावमधील १११ विहिरींसाठी १६ लाख ४८ हजार २०६ रुपये, राहुरीतील ४९ विहिरींसाठी ७ लाख ३२ हजार ८४४ रुपये..श्रीरामपूरमधील ४६ विहिरींसाठी ६ लाख ६० हजार ६०३ रुपये, नेवासा येथील ४३ विहिरींसाठी ५ लाख १० हजार ८६४ रुपये, संगमनेरमधील २१ विहिरींसाठी ३ लाख १४ हजार ७६ रुपये, कोपरगावच्या १२ विहिरींसाठी ४ लाख ४ हजार ४०० रुपये व पारनेरला १ लाख ७१ हजार ६१२ मंजूर करण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.