Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने मोहीम राबवून जिल्ह्यातील १२०० गावांमधील ६० हजार गट नंबर ‘डीम्ड एनए’ (मानीव अकृषिक) म्हणून घोषित केले आहेत. या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी कोल्हापुरात झाली असून, याचा थेट लाभ ३ लाख नागरिकांना मिळणार आहे..महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२ आणि २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार, गावठाणाच्या हद्दीपासून २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रातील जमिनी अकृषिक समजल्या जाव्यात, असे निर्देश आहेत..Land Issues: शेतजमीन नावावर करण्यास दिरंगाई!.यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आणि भूमी अभिलेख विभागाने विशेष मोहीम राबवून रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक वापरासाठीच्या जमिनींचे गट नंबर व सर्व्हे नंबर निश्चित केले. पूर्वीच अकृषिक झालेल्या जमिनी वगळून उर्वरित ६० हजार गट नंबरच्या व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत..NA Land Rule: बॅंकांच्या ‘एनए’चा उद्योगांना अडसर.यासंदर्भात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, की या शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा कोल्हापूर राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या निर्णयामुळे ६० हजार गट नंबर ‘डीम्ड एनए’ होत असून, आता तलाठ्यांमार्फत गावोगावी नोटीस देऊन संबंधित जमीनधारकांना अवगत केले जाईल. त्याबाबत नागरिकांना प्रशासनाने सुलभतेने माहिती द्यावी.....अशी असेल कार्यपद्धतीया निर्णयाची कार्यपद्धती स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की आता तहसील कार्यालयामार्फत संबंधित जमीनधारकांना अकृषिक आकारणीचे चलन पाठवले जाईल. जमीनधारकाने शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार अकृषिक सारा व रूपांतरित कर जमा केल्यानंतर, तहसीलदार त्यांना तत्काळ अकृषिक सनद प्रदान करतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.