Washim Shekari Karjmukti List: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील ५८ हजार ९१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत आतापर्यंत ५३०.९८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या चौथ्या टप्प्यात ८ हजार २७८ शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे..चौथ्या टप्प्यात सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) अंतर्गत एक हजार ७०५ शेतकऱ्यांच्या खात्यांत १२.२४ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील सहा हजार ५७३ शेतकऱ्यांना ७१.७६ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे..Fodder Shortage Issue: वाशीम जिल्ह्याबाहेर चारा विक्री, वाहतुकीस मनाई; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.पहिल्या ते चौथ्या टप्प्यांपर्यंत जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ९१९ शेतकऱ्यांना ५३०.९८ कोटी रुपये मिळाले आहेत.जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील एकूण ६९ हजार ९२४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे..Farmer Loan Waiver: नांदेड जिल्ह्यात नव्याने ५५ हजार शेतकरी कर्जमुक्त.त्यापैकी ६० हजार ९७७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप ८ हजार ९४७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी..त्यानंतर फार्मर आयडी व आधार क्रमांकासह नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. ही प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.