Gondia News: सरकारने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाचे तब्बल ५८० कोटी १७ लाख रुपयांचे चुकारे अद्याप थकीत आहेत. ऑक्टोबर २०२५ पासून खरेदी सुरू झाली असली तरी, चार महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत..जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये आतापर्यंत २८ लाख ५७ हजार ४७० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी एकूण ९५८ खरेदी केंद्रे कार्यरत होती. धान विक्रीसाठी ७७,५२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून तितक्याच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विक्री केली आहे. परंतु शासनाने हमीभावाने धान खरेदी केली असली तरी चुकारे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे..Maize Farmer Issue: मेळघाटातील मका उत्पादक शेतकरी हवालदिल.खरीप हंगामातील पीक कापणी व विक्रीनंतर मिळणाऱ्या पैशांवरच शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करतात. मात्र चार महिने उलटूनही चुकारे न मिळाल्यामुळे अनेकांना सावकार, नातेवाईक आणि बँकांकडून कर्ज काढावे लागत आहे. धानाचे पैसे न मिळाल्यामुळे रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, मजुरी आणि सिंचनासाठी निधी उभारणे कठीण झाले आहे. .अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड उशिरा केली असून काहींना लागवडच टाळावी लागली आहे. ही बाब गंभीर असून, याची दखल घेत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे..Pending Onion Payment: कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकित पैसे संक्रांतीच्या आत द्या: छगन भुजबळ.शेतकऱ्यांमध्ये संतापचार महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. अनेकांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्यांची दखल न घेण्यात आल्याने प्रश्न ‘जैसे थे’ आहे..तातडीच्या उपाययोजनांची गरजशेतकऱ्यांचे चुकारे तत्काळ अदा करण्यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अन्यथा जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.