Chhatrapati Sambhajinagar News: वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचबरोबर वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे..जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ लिव्हिंग) महावितरणने वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन द्याव्यात जेणेकरून वीज ग्राहकांना घरबसल्या सुविधांचा लाभ घेता येईल व त्यांना कार्यालयात जावे लागणार नाही, असा प्रयत्न चालू आहे. .MSEDCL SMS Service : तेरा लाखांवर ग्राहकांना वीजसेवेची माहिती मिळते ‘एसएमएस’वर.त्यानुसार महावितरणने वीज कनेक्शन नावात बदल आणि मंजूर भार बदल यासाठी ऑनलाइन व झटपट सुविधा उपलब्ध केली आहे. खरेदी-विक्री, वारसा हक्क किंवा इतर कारणांमुळे घर किंवा इतर मालमत्तेच्या मालकीमध्ये बदल झाल्यानंतर वीजबिलाच्या ग्राहक नावात बदल करण्यासाठी अर्ज करण्यात येतो. या प्रक्रियेसाठी महावितरण मोबाइल ॲप अथवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीजग्राहकांना ‘लॉग-इन’द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करता येतो..Agriculture Digital Services: जमिनीच्या दाव्यांची माहिती घरबसल्या मिळणार; डिजिटल सेवांचा नवा प्रारंभ.ग्राहकाला कोणत्या कारणासाठी नाव बदलणे आवश्यक आहे त्याचा पर्याय निवडला की, त्यानुसार आवश्यक ते निवडक दाखले जोडावे लागतात. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर तीन ते सात दिवसांत नावातील बदलाची प्रक्रिया पूर्ण होते. महावितरणने लघूदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ केला. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आता १०,४२८ झाली आहे व त्यांनी ६९.३७ मेगावॅट भार वाढवून घेतला आहे. .अस्तित्त्वातील जोडणीच्या वीजभारामध्ये वाढ किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानंतर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येते. वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होतो व केवळ २४ तासांत कार्यान्वित होतो. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येतो. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.