Nashik News: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य शासनाने यापूर्वी तीन वेळा आश्वासने दिली, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आणि अखिल भारतीय किसान सभेने या प्रलंबित मागण्यांसाठी ‘लाँग मार्च’चे आयोजन केले आहे. तब्बल ५५ हजार शेतकरी व आदिवासींचे हे ‘लाल वादळ’ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता.२५) हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आहे. .यापूर्वी किसान सभेतर्फे मुंबईला लाँग मार्च काढण्यात आले होते. त्या वेळी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांबाबत मोर्चेकरी समाधानी नाहीत. अलीकडे पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० आदिवासींच्या ऐतिहासिक मोर्चाला सरकारकडून स्थानिक मागण्या मान्य करवून घेण्यात यश मिळाले;.Farmer Protest: नाशिकमधून उद्या मुंबईकडे ‘लाँग मार्च’.मात्र राज्यस्तरीय मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आता नाशिकमधून एल्गार पुकारण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व ‘माकप’चे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, ‘सीटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, नाशिक जिल्हा सचिव इंद्रजित गावित आणि किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख करत आहेत..Farmers and Workers Protest: बारा फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक.वनाधिकार कायदा आणि पेसा या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी, दुष्काळी भागासाठी आणि शेतीसाठी रखडलेल्या सिंचन योजना, शेतीला २४ तास अखंड वीजपुरवठा,शेतमालाला हमीभाव, नदीजोड प्रकल्प अशा शेतकऱ्यांच्या मागण्यांसह शाळांमधील हजारो रिक्त शिक्षकांची भरती, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत..मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराकॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांवर मोर्चाने कडाडून टीका केली आहे. स्थानिक पातळीवर मागण्या मान्य होत नसल्याने आम्ही न्याय्य हक्कांसाठी राजधानीकडे निघालो आहोत. प्रश्न सुटले नाही तर मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.