Village Development: ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुरक्षित, शांत आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने अभिनव पाऊल उचलले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज अभ्यासिकांची उभारणी सुरू आहे.