Pune News: अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केल्याने कापड, कोळंबी, हिरे व सोन्याचे दागिने, चमड्याच्या वस्तू, सोयापेंड, फळे व भाजीपाला निर्यात उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. देशात हे उद्योग सर्वाधिक रोजगार देणारे असल्याने लाखो लोक बेरोजगार होण्याची चिन्हे आहेत. या संकटातून दिलासा मिळण्यासाठी उद्योगांनी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. तर सरकारही २५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. .भारताने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ८ हजार ६५० कोटी डाॅलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. मात्र २०२५-२६ मध्ये ही निर्यात ५ हजार कोटींवरच स्थिरावण्याचा अंदाज आहे. कापड, कोळंबी, चमड्याच्या वस्तू, हिरे व सोन्याची दागिने यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारताची निर्यात कमी झाल्यानंतर या वस्तूंची चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान, मेक्सिको आणि इक्वेडोरमधून अमेरिकेला निर्यात वाढणार आहे..India US Trade: भारतावर आजपासून ५० टक्के शुल्क लागू.कापड उद्योग अडचणीतभारताच्या कापडावर अमेरिकेत आता एकूण ५१ टक्क्यांच्या दरम्यान शुल्क लागणार आहे. त्यामुळे निर्यात कमी होणार असल्याने भारतातील कापड हबमध्ये काळजीचे वातावरण आहे. तिरूपूर आणि सूरत येथील कारखान्यांनी कापड निर्मिती कमी केली तर काही कारखान्यांनी उत्पादनच बंद केले आहे. कापड उद्योगात लाखो लोक काम करत आहेत. अमेरिकेच्या निर्णयामुळे यातील किमान २० टक्के लोकांचा रोजगार जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे..कोळंबी उद्योगाला मोठा फटकाअमेरिका भारताच्या कोळंबीची मोठी बाजारपेठ आहे. परंतु आयात शुल्कवाढीमुळे गेल्या १५ दिवसांपासून निर्यात ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला साडेसातशे कोटी डाॅलर्सची सागरी उत्पादने निर्यात केली होती. त्यात ७० टक्के वाटा फ्रोझन कोळंबीचा होता. आता अमेरिकेतील ग्राहक भारताच्या कोळंबीसाठी जास्त पैसे मोजणार का, हा प्रश्न आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणारे अमेरिकेचे ग्राहक असे करण्याची शक्यता कमीच आहे. त्याचा परिणाम देशातील कोळंबी उद्योगावर होईल. या उद्योगातील हजारो लोकांचा रोजगार जाऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत.दागिने निर्यात निम्म्यावर येणारभारताने २०१४-२५ मध्ये अमेरिकेला १ हजार कोटी डाॅलर्सचे हिरे व दागिने निर्यात केले होते. आता ५० टक्के शुल्क लागू झाल्याने निम्मी निर्यात थांबणार आहे. असे झाल्यास या उद्योगात काम करणाऱ्या दीड लाख लोकांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. देशातील काही मोठ्या निर्यातदारांनी अमेरिकेतील व्यापार तज्ज्ञांशी चर्चा सुरू करून ज्या देशांवर कमी शुल्क आहे त्या देशांच्या मार्गे अमेरिकेला दागिने निर्यात शक्य आहे का, याची चाचपणीही सुरू केल्याचे जेम्स अॅन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने म्हटले आहे..निर्यात अनुदानाची चर्चादेशातून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार २५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. अमेरिकेला वस्तू निर्यात करणाऱ्या निर्यातदारांची यासंदर्भात लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले..सरकारकडे उद्योगांच्या मागण्याउद्योगांना कर्ज परतफेड व व्याज सवलत द्यावी.सरकारने हमी घेऊन उद्योगांना कर्जपुरवठा करावा.उद्योग अडचणीत आले तरी रिझर्व्ह बॅंकेने उद्योगांना खेळते भांडवल पुरवठ्याचे धोरण कायम ठेवण्यास बॅंकांना आदेश द्यावेत.वस्त्रोद्योगाला चीनप्रमाणे ३ टक्क्यांनी कर्जपुरवठा करावा.उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी व विम्याचा वाटा सरकारने भरावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.