Yavatmal News: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत गावातील मालमत्ता धारकांकडून १०० कर वसुली व्हावी, याकरिता शासन निर्णयानुसार ग्रामस्थांना घर आणि नळ बिलामध्ये ५० टक्के दौलत देण्याचा निर्णय पाथ्रडगोळे (ता. नेर) ग्रामपंचायतीने घेतला, असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे..मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट पाथ्रडगोळे ग्रामपंचायतीने ठेवले आहे. टॅक्स वसुलीच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पाथ्रडगोळे ग्रामपंचायतींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाऊल उचलले. टॅक्स वसुलीतून ग्रामपंचायतीला आर्थिक बळ मिळावे, असा उद्देश यामागे आहे..Farmers Income Tax : मोदी सरकारच्या नेमकं डोक्यात काय?, शेतकऱ्यांनाही इनकम टॅक्स भरावा लागणार?.याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावच्या सरपंच नीलिमा रोशन चोपडे यांनी ग्रामसभेच्या अध्यक्षा म्हणून कामकाज पाहिले. सोबतच गावच्या उपसरपंच रजनी खडसे, ग्रामविकास अधिकारी अमोल गावंडे., तंटामुक्ती अध्यक्ष अनिल चव्हाण, गजानन गोळे, नितीन चहांदे, आकाश तोंडरे, मिलिंद गायनर, .Farmer Income Tax: अर्थसंकल्पात श्रीमंत शेतकऱ्यांवर प्राप्तीकर लावण्याच्या चर्चेला उधाण | ॲग्रोवन.पंजाबराव खडसे, गुलाबराव ढबाले, हर्षदा गावंडे, शारदा ढबाले, निकिता कुऱ्हाटकार, ग्रामसंघाचे अध्यक्ष सविता गावंडे, महानंदा ढोक, हितेश गावंडे, रवी मानव सुराज्य, देवानंद गायनर, श्रीधर घोडे, नरेंद्र गायनर, मंगेश गायनर, प्रमोद गोडे, बहुसंख्येने गावातील महिला, नागरिक उपस्थित होते..या ग्रामसभेत शासन निर्णय वाचण्यात आला. त्यानुसार २०२५ पर्यंतचे थकबाकीदार ग्राहकांना ५० टक्के करांमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे लोकचळवळ म्हणून पुढे नेण्यासाठी सगळे गाव कटिबद्ध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.