Jalgaon News: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत ‘महावितरण’च्या जळगाव परिमंडलातील ४९ हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्याकडे घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीतून माध्यमातून १८०.७६ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. .यात जिल्हा सौरऊर्जा वीजनिर्मितीमध्ये अग्रेसर असून, दररोज सुमारे ११३.१२ मेगावॉट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली आहे. पीएम-सूर्यघर योजनेंतर्गत वीज ग्राहकांना वीजबिल शून्य येण्यासाठी तसेच सौरऊर्जेतून वीजनिर्मिती अधिक अधिक करण्यासाठी ‘महावितरण’कडून प्रोत्साहन दिले जात आहे..Agriculture Solar Power Generation : शिळ्या कढीला ऊत.यात ग्राहकांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळवता येत आहे. या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते..शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास ‘महावितरण’कडून ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. जळगाव परिमंडलात वीजग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. .सौरऊर्जा वीजनिर्मिती आकडेवारीजिल्हा वीजनिर्मिती (मेगावॅट)जळगाव ११३.१२ धुळे ४७.४०नंदुरबार २०.२४एकूण १८०.७६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.