Parbhani News : जिल्ह्यात यावर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकानीपोटी राज्य शासनाने १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. .शनिवार (ता. ४) पर्यंत पोर्टलवर उपलब्ध ८५ हजार ४८९ शेतकऱ्यांना जिल्हास्तरीवरुन मंजुरी देण्यात आली तर ४८ कोटी २३ लाख १९ हजार रुपये एवढी रक्कम महा आयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. .Crop Damage Compensation : भरपाईमधून चंद्रपूर जिल्ह्याला वगळले .फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट तर शेतकरी ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवाय केल्यानंतर अनुदानाची रक्कम जमा होणार, असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली..यंदा (२०२५) जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या ६ तालुक्यातील ३९१ गावातील २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांच्या जिरायती,बागायती,फळपिके मिळून एकूण १ लाख ५१ हजार २२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने गुरुवारी (ता. १८) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. .Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना चौपट दराने मदत द्या.जून ते ऑगस्ट कालावधीत परभणी जिल्ह्यातील ६ तालुक्यातील १ लाख ५१ हजार २१२ हेक्टरवरील जिरायती पिके तसेच १०.४० हेक्टरवरील फळपीकांचे ३३ टक्केवर नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयेनुसार तर फळपीकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये नुसार रक्कम वितरित केली जात आहे. .त्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यांना विशिष्ट क्रमांक (व्ही.के.) देण्यात येत आहेत. विशिष्ट क्रमांक दिल्यानंतर अॅग्रीस्टॅक अंतर्गंत फार्मर आयडी (शेतकरी ओळखक्रमांक) प्राप्त बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. परंतु फार्मर आयडी नसेल तर संबंधित बाधित शेतकऱ्यांनी ई केवायसी केल्यानंतर रक्कम जमा होईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.