Solapur News : गतवर्षीचा हंगाम संपून सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. यंदाचा ऊस हंगाम दीड महिन्यांवर आला आहे. दिवाळी तोंडावर आली आहे, तरीही सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे ऑगस्टअखेर अजूनही ४२ कोटी रुपये एफआरपी थकली आहे..गतवर्षी राज्यात २०० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये ८५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या उसाची २४ हजार ५११ कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तथापि, राज्यातील ५४ कारखान्यांकडे ऑगस्टअखेर अद्यापही ३०४ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. राज्यातील १४६ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे..Sugarcane FRP: एकरकमी एफआरपीप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी: राजू शेट्टी .गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये एक कोटी चार लाख ७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. जिल्ह्यात गाळप झालेल्या उसाचे दोन हजार ७५५ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील आठ कारखान्यांकडे ४२ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे दिसून येत आहे..गतवर्षी हंगाम सुरू होताना जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस मिळविण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रतिटन २७०० ते ३५०० रुपयांदरम्यान उसाचा पहिला हप्ता जाहीर केला होता. जाहीर केलेल्या ऊसदराप्रमाणे केवळ १७ कारखान्यांनीच शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे ऊसबिले दिली आहेत. १६ कारखान्यांकडे प्रत्यक्षात अजूनही १५७ कोटी रुपयांची ऊसबिले अडकली आहेत..Sugarcane FRP Dues : अठ्ठावीस कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई.‘या’ कारखान्यांवर झाली कारवाईराज्यात मागील हंगामात २८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली. त्यापैकी जिल्ह्यातील मातोश्री, गोकूळ शुगर्स, लोकमंगल बिबीदारफळ व भंडारकवठे, जयहिंद, संत दामाजी, सिद्धनाथ, इंद्रेश्वर, धाराशिव (सांगोला), सहकार शिरोमणी, सिद्धेश्वर, आवताडे शुगर्स, भैरवनाथ(लवंगी) या १३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. .आरआरसी कारवाई झालेल्या कारखान्यांपैकी लोकमंगल बिबीदारफळ व भंडारकवठे, संत दामाजी, धाराशिव (सांगोला), आवताडे शुगर्स, भैरवनाथ (लवंगी) या सहा कारखान्यांनी ३१ ऑगस्टअखेर एफआरपी दिली आहे. बाकीच्या कारखान्यांकडे आरआरसी होऊनही अद्याप एफआरपी थकीत आहे.कारखानानिहाय थकीत एफआरपी (कोटीत)कारखाना थकीतसिद्धेश्वर १८.०३सिद्धनाथ १.७५इंद्रेश्वर २.६१गोकूळ शुगर्स ४.४३मातोश्री ५.३८जयहिंद ८.२७भीमा १.१९सहकार ०.५३शिरोमणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.