Nashik News: बागलाण पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील ४१ रिक्त पदांमुळे तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. तालुक्यातील २४ पैकी चार दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याचे चित्र आहे. .तालुका पशुधन उपचाराचे मुख्यालय असलेल्या मळगाव येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा कारभारही अतिरिक्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असल्याने संपूर्ण तालुक्यातील पशुधन उपचार व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे..Veterinary Clinic: पशुवैद्यकीय दवाखान्यांचे पालटणार रूपडे.बागलाण तालुक्यात प्रथम श्रेणी एकचे दहा तर द्वितीय श्रेणी दोनचे १४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी प्रथम श्रेणीच्या चार दवाखान्यांचा कारभार अतिरिक्त पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे आहे. पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा एकूण ४१ पदे रिक्त आहेत..अतरिक्त पदांमुळे आजारी जनावरांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा जनावरे दगावण्याच्या घटनाही घडत असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करावी, अन्यथा जनावरांची होत असलेली हेळसांड थांबणार नाही, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे..Veterinary Services: कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी.बागलाण तालुक्यातील मंजूर व रिक्त पदांचा तपशीलपद मंजूर भरलेली रिक्तपशुधन विकास अधिकारी ११ ०७ ०४सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०२ ०२ ००पशुधन पर्यवेक्षक १४ ०६ ०५वर्णोपचारक ०८ ०३ ०५परिचर ३१ ०४ २७अर्धवेळ सफाई कर्मचारी ०१ ०१ ००एकूण ६४ २३ ४१.रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच ही पदे भरण्यात येतील.डॉ. कीर्ती फनसे, प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी.पाळीव जनावरे आजारी पडल्यास खासगी डॉक्टरांना बोलवावे लागते. ते मनमानी शुल्क घेतात. वेळेवर उपचार न झाल्यास जनावरे दगावतात.केवळ देवरे, शेतकरी, करंजाड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.