Solapur News : ‘‘बांबू आधारित उद्योगासाठी ४००० कोटी रुपये खर्च करून पुढील सात वर्षांसाठी आशियायी विकास बँकेच्या (एडीबी) माध्यमातून प्रकल्प राबवला जाणार आहे. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यासह सामंजस्य करार आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत गुरुवारी (ता. १८) होणाऱ्या परिषदेमध्ये केले जातील,’’ अशी माहिती महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्फॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे वित्तीय सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी दिली..राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह ‘एनटीपीसी’ सोलापूरचे प्रकल्प प्रमुख बी. जे. सी. शास्त्री, शासकीय यंत्रणांचे विविध पदाधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक बांबू मूल्यवर्धन साखळी विकास आणि उभारणी या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली..Bamboo Cultivation : सातारा जिल्ह्यात बांबूची ११०० हेक्टरवर लागवड.या वेळी श्री. परदेशी म्हणाले, की ऊर्जा निर्मितीसाठी बायोमास धोरणांतर्गत मोठ्या प्रमाणात बांबूची मागणी आहे. बांबू आहे त्या स्वरूपात न देता तो टोरिफाइड आणि पॅलेट तयार करून देणे आवश्यक असणार आहे. स्मार्ट’ प्रकल्पाप्रमाणेच ‘एडीबी’मार्फत चार हजार कोटी रुपये खर्च करून सात वर्षांचा प्रकल्प बांबूसाठी सुरू करत आहोत. यामध्ये बांबू लागवड प्रोत्साहन, बांबू संशोधन, बांबूचे नवीन वाण विकसित करणे तसेच बांबू उद्योग उभारणीसाठी अनुदान, प्रोत्साहन देणे हे घटक अंतर्भूत आहेत, असे परदेशी यांनी स्पष्ट केले..श्री. पटेल म्हणाले, की पुढील पाच ते दहा वर्षांत बांबू लागवड हा एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. बांबूची लागवड केल्यावर तो विकत कोण घेणार हा प्रश्न आता या निमित्ताने पूर्णत्वाला जाणार आहे. रोजगार हमीतून सध्या दिले जाणारे सात लाख रुपये प्रति हेक्टरी अनुदान काही शासकीय विभागाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. .Bamboo Cultivation : चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड.सध्या शेती मजुरांचा अभाव आणि वातावरण बदलाने परवडेनासी झाली आहे. बांबूपासून ऊर्जा निर्मिती इथेनॉल, मिथेनॉल आणि सर्व प्रकारच्या वस्तू तयार केल्यामुळे एक नवी अर्थव्यवस्था तयार होईल, असे ते म्हणाले..श्री. परदेशी यांनी प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने शंभर एकरवरील शेतकऱ्यांची करार करून बांबू लागवडीचे ध्येय साध्य करावे. खरेदीचे हमी सरकार, उद्योगामार्फत घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगितले.‘स्मार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनीही सध्याच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून बांबू लागवडीसाठी आणि प्रक्रियेसाठी आवश्यक मदत केली जाईल, असे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.