Chh. Sambhanjinagar News : नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी तसेच त्याच्या खरेदीला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्रात बुधवारी (ता. १४) करण्यात आले होते..विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, आत्माच्या प्रकल्प संचालिका धनश्री जाधव, उप प्रकल्प संचालक डॉ. अभय पडिले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..Wild Vegetables: रानभाज्यांना मिळाली बाजारपेठ.या महोत्सवामध्ये घोळ, टाकळा, फांदीची भाजी तांदुळजा, वावडिंग सराटे, उंबर, कपाळ फोडी, कढीपत्ता, राजगिरा,पानांचा ओवा, अंबाडी केना, पाथरी, शेवगा, काटेमठ, गुळवेल अळू, मोठा घोळ, लाजाळू, कुद्री, वाघाट, शेपू, चवळी, समुद्र शोक,करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, शेवगा, तरोटा यांसारख्या विविध पारंपरिक रानभाज्या शेतकऱ्यांनी आणल्या होत्या. .Wild Vegetables Fair : सातपुड्याच्या पायथ्याशी रंगतोय सालईबन रानभाजी महोत्सव.बदनापुरातही रानभाजी महोत्सवजालना जिल्ह्यातील बदनापूर येथे कृषी विज्ञान केंद्रात आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली रानभाजी महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक दीपक पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख सचिन सोमवंशी, डॉ. सचिन दांडगे, डॉ. कांबळे डॉ. तडवी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धैर्यशील पाटील, दत्तात्रय सूर्यवंशी, आत्माराम मोरे यांची उपस्थिती होती. .डॉ. दीपक पाटील यांनी रानभाज्यातील आहाराचे महत्त्वयावर मार्गदर्शन केले. डॉ. सचिन सोमवंशी यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकलेली रानभाजी आरोग्यास उपायकारक कशी यावर मार्गदर्शन केले. ४० पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन पार पडले. रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थही चवीनिशी उपलब्ध होत्या. कार्यक्रमाला आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक व सहायक तंत्र व्यवस्थापक यांची उपस्थिती होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.